You are currently viewing श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

दोडामार्ग :

श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे या प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक जयसिंगराव वाघमोडे, श्री. आंबुलकर सर, श्री. राठोड सर व शिक्षकेतर कर्मचारी सुहास देसाई व प्रवीणा गवस उपस्थित होते.

यावेळी श्री. वाघमोडे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. तर श्री आंबुलकर सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती सांगितली. शेवटी श्री. वाघमोडे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा