You are currently viewing माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर पुन्हा एकदा “सक्रीय”…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर पुन्हा एकदा “सक्रीय”…

सावंतवाडी
गेले काही दिवस राजकारणापासून अलिप्त असलेले सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते बबन साळगावकर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकारणात “सक्रीय” झाले आहेत. आज त्यांनी श्री.पवारांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील शिवाजी चौक परिसरात साखर वाटली.
अन्न क्रांतीचे जनक असलेल्या श्री.पवार यांना उदंड आयुष्य लाभो, अशी ईश्वराकडे प्रार्थना केली. श्री.साळगावकर हे गेले काही दिवस राजकारणात तेवढेसे सक्रीय नव्हते, विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर नगराध्यक्षपदाची निवडणूक या दोन ठिकाणी त्यांना अपयश आल्यामुळे ते काहीसे राजकारणापासून दूर होते. मात्र आज मा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ते पुन्हा एकदा सक्रिय झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या समवेत त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आनंद साजरा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =