You are currently viewing सिंधुदुर्ग विमानतळावरून सिंधुदुर्ग – बंगळुरू सेवा सुरु

सिंधुदुर्ग विमानतळावरून सिंधुदुर्ग – बंगळुरू सेवा सुरु

वेंगुर्ला :

 

सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय 91 विमानकंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली आहेे. या सेवेचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. यावेळी माजी सभापती निलेश सामंत, फ्लाय 91 कंपनीचे मनोज चाको, आशुतोष चिटणीस, आय आर बि.कंपनीच कुलदीपसिंग, परूळे सरपंच प्रणिती आंबडपालकर,  कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, भूषण देसाई, प्रसाद पाटकर, प्रकाश राणे, बाळा राऊळ, उपसरपंच संजय दुधवडकर, राणे,  करलकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय 91 हि विमान कंपनी पहिल्या टप्यात हैद्राबाद व बंगळूरू अशी सेवा सुरु होणार आहे. या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नुकतीच प्रवाशी वाहतूकीची परवानगी दिली आहे. 2 मार्च रोजी गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळा वरुण बंगळूर कडे विमावाने उड्डाण करून शुभारंभ केला आहे. व्यवसायीक उड्डाणसाठी जी, परवानगी आवश्यक असते ती कंपनीला एप्रिल 2023 मध्येच मिळाली आहे. नवीन विमानकंपनी हि मूळची गोव्यातील आहे. कंपनीने परवानगी च्या सर्व परिक्षा दिल्या आहेत व पूर्ण केल्या आहेत. शासनाच्या उडाण योजनेत काही मार्ग निश्चित करण्यात आले आहेत यात महाराष्ट्रातील जळगाव, नांदेड, सह सिंधुदुर्गचाही समावेश आहे. सिंधदुर्ग विमानतळावरुन सेवा सुरू झाली आहे. तसेच हि कंपनी पर्यटकांसाठीही विशेष विमानसेवा चालवणार असल्याचे समजते. अशा प्रकारे विमानकंपनी सिंधुदुर्ग विमानतळा वरून सेवा सुरू झाल्यानंतर या विमानतळाचे महत्त्व वाढेल अशी आशा आहे. सकाळी विमानतळावर विमान दाखल झाले तेव्हा त्याला पाणी सलामी दिली गेली. त्यानंतर प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. दुपारी 1.15 ला विमान बंगळुरू येथे रवाना झाले व 2.40 मिनिटानी बंगळुरू विमानतळ येथे पोहोचले. यावेळी पाहिल्या प्रवासाचा आनंद प्रवासी यांनी घेतला. नवीन विमान कंपनी असल्याने सध्या गोवा बंगळुरू, हैदराबाद सिंधुदुर्ग, बंगळुरू अशा फेरी होतील. मे महिन्यात सिंधुदुर्ग पुणे विमानसेवा सुरू होईल असे विमान कंपनी कडून सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =