सातार्डा पूलाची दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको करू : सुधा कवठणकर
सातार्डा
महाराष्ट्र व गोवा राज्य जोडणाऱ्या सातार्डा येथील तेरेखोल पुलाचे कॉक्रिटीकरण दोन महिन्यांनी पुन्हा खचले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची दुरुस्थी न केल्यास कार्यकर्त्यांना घेऊन रस्ता रोको करण्याचा इशारा शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते व आमदार निलेश राणे समर्थक सुधा कवठणकर यांनी दिला आहे.तेरेखोल पुलाला पडलेल्या दरीमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. अपघात होण्याची भीती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन महिन्यांपूर्वी पुलाला पडलेल्या दरीला काँक्रेट घातले होते. दोन महिन्यांनी रस्ता व पूल यामध्ये दरी पडली आहे. महाराष्ट्र व गोवा राज्य जोडणाऱ्या तेरेखोल पुलाच्या दरीची तात्काळ दुरुस्थी करावी अन्यथा तेरेखोल पुलाच्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते सुधा कवठणकर यांनी दिला आहे.