You are currently viewing कणकवली नगरपंचायत च्या शिरपेचात मनाचा तुरा

कणकवली नगरपंचायत च्या शिरपेचात मनाचा तुरा

स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये राज्यात 67 वा तर जिल्ह्यात तिसरा क्रमांक

प.झोन मध्ये 232 वरून 67 व्या स्थानावर झेप

कणकवली

कणकवली नगरपंचायत ने स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशाच्या प.झोन मध्ये राज्यात 67 वा क्रमांक मिळविला आहे अशी माहिती नगरपंचायत आरोग्य सभापती संजय कामतेकर यांनी दिली. गतवर्षी च्या 232 व्या स्थानावरून देशाच्या प.झोनमधून राज्यात67 व्या स्थानावर झेप घेत वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपालिकांनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

मारकंग 2021 मध्ये केंद्र सरकारच्या पथकाने कणकवलीत येऊन शहरातील स्वच्छता साफसफाई, सार्वजनिक शौचालये आदींची पाहणी केली होती. कणकवली शहरातील नागरिकांशीही संवाद साधला होता. या पाहणीतून आणि कणकवलीवासीय नागरिकांनी दिलेल्या फीडबॅक नंतर केंद्रीय पथकाने आपला अहवाल सादर केला होता. या अभियानात नगरपंचायत च्या यशात सातत्य राखण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, माजी आरोग्य सभापती अभि मुसळे, सर्व विषय समिती सभापती, सर्व नगरसेवक यांनी जनजागृती आणि प्रत्यक्ष नागरिकांचा सहभाग यासाठी मेहनत घेतली होती.

नगरपंचायत आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली होती. कणकवली नगरपंचायत ने मिळविलेले हे यश समस्त कणकवलीवासीय नागरिकांच्या सहकार्यामुळे मिळाले असून यापूढेही यात सातत्य राखावे असे आवाहन आरोग्य सभापती संजय कामतेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − ten =