मालवण :
मालवण तालुक्यातील पोईप विरण जोडणारा पूल नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत कोसळून धोकादायक बनला होता. या पुलाची आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सोमवारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी दुरुस्तीचे केवळ आश्वासन न देता पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचाही शुभारंभ देखील तात्काळ येथे पार पडला.
काही दिवसांपूर्वी मालवण बेळणे मुख्य मार्गावरील विरण पोईपला जोडणाऱ्या पुलाची संरक्षक भिंत कोसळून पुलावरून अवजड वाहतूक बंद झाली होती. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाबाबत मागणी केली होती. दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास सदर पुलाचा विषय आणून दिल्यानंतर सोमवारी आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या पुलाची पाहणी केली. यावेळी वाहतुकीची गैरसोय होत असल्याने कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता पुलाचे काम सोमवारपासूनच सुरू करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. हे काम पूर्ण झाल्यावर निकष प्रमाणे पुलाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अशी सूचना दिली.
मागील काही दिवसांपासून पुलाची संरक्षक भिंत कोसळल्याने या पुलावरून अवजड वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. या पुलावरून सध्या एकेरी वाहतूक चालू असून आता काही दिवसातच शाळा सुरू होणार असल्याने वाहतुकीसाठी विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण होणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाबाबत अनिल कांदळकर व ग्रामस्थांनी माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच आमदार निलेश राणे यांनी सोमवारी सकाळी विरण येथे जाऊन पाहाणी केली. पुलाच्या संरक्षक भिंत आणि खचलेल्या भागाचे काम तात्काळ सुरु करा. अश्या सूचना बांधकाम अधिकारी यांना करत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे स्पष्ट केले. दरम्यान आमदार निलेश राणे यांच्या निर्देशानुसार प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, जिप माजी अध्यक्ष संजय पडते, जिप माजी सभापती अनिल कांदळकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, पोईप सरपंच श्रीधर नाईक, माजी नगरसेवक दीपक पाटकर, किरण प्रभू, पंकज वर्दम, जितेंद्र परब, प्रशांत परब, कांता चव्हाण, दत्ताराम आंबेरकर, विलास पांजरी, मोहन पांजरी, दयानंद प्रभूदेसाई, गोपीनाथ पालव, विलास माधव, सचिन पालव, दाजी येरम, नारायण उर्फ पप्पू राणे, संदीप सावंत, सत्यवान पालव, अशोक पालव, महेश पालव, सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता अजित पाटील, कनिष्ठ अभियंता पुरुषोत्तम भोये यांसह पोईप व विरण मधील शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार निलेश राणे खऱ्या अर्थाने जनतेचे नेतृत्व आहेत. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नाशील असतात. मोठा विकासनिधी मतदारसंघात आणण्यात ते यशस्वी ठरले. आताही पुलाची समस्या त्यांच्या निदर्शनास येताच तातडीने काम सुरु करण्याबाबत त्यांनी घेतलेली भुमिका जनहिताची आहे. गेल्या दहा वर्षाचा विचार करता मतदारसंघात हे पहिल्यांदा होतंय. असे सांगत माजी सभापती अनिल कांदळकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पुलाच्या दुरुस्तीबाबत तात्काळ कार्यवाही केल्याने पोईप व विरण गावातील ग्रामस्थांनी आभार मानले.