कणकवलीतील युवक डोळ्यासमोर अंधार आल्याने, दुचाकीवरून तोल जावून कोसळला

कणकवलीतील युवक डोळ्यासमोर अंधार आल्याने, दुचाकीवरून तोल जावून कोसळला

कुडाळ

कणकवली येथे राहणारा प्रकाश भीमसेन कांबळी हा युवक एका बँकेत एजंट म्हणून कामाला आहे. आज दुपारी दोडामार्ग माडखोल वरून कामानंतर घरी परतत असताना दुचाकीवरून कुडाळ पिंगुळी येथे आल्यावर अचानक त्याच्या डोळ्यावर अंधारी येऊ लागली, तरीपण दुचाकी सावरत-सावरत  त्याने रस्त्याच्या बाजूला स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला परंतु अचानक त्याचा तोल जाऊन तो कोसळला, हे दृश्य तेथे असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष सर्वेश पावस्कर , सनी मोरे जिल्हा चिटणीस विद्यार्थी संघटना सरचिटणीस अनिकेत बंगे, व सागर मयेकर यांनी पाहिलेेेे त्यावेळी त्यांनी पाणी पाजून त्याला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न केला पण काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याला कुडाळमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले. सद्यस्थितीत त्या तरुणाची तब्येत ठीक असल्याचे डॉक्टरने कळविले. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केल्याने त्याच्या घरच्यांनी त्यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा