फोंडाघाटचे ज्येष्ठ व्यापारी व समाजसेवक रमेश भोगटे यांचे निधन; परिसरात शोककळा
व्यापारी व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; अंत्ययात्रेनिमित्त दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली
फोंडाघाट :
येथील ज्येष्ठ व्यापारी, समाजसेवक तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय असलेले स्व. रमेश भोगटे यांचे निधन झाल्याने फोंडाघाट परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने व्यापारी तसेच सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
स्व. भोगटे हे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, श्री साई मंदिराचे सचिव, वैश्य समाज पतसंस्थेचे माजी संचालक तसेच श्री राधाकृष्ण मित्र मंडळाचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यामुळे ते सर्वांच्या आवडते व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या अंत्ययात्रेनिमित्त फोंडाघाटमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. हवेली नगर येथील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पार्थिवाचे दर्शन घेतले.
यावेळी अजित नाडकर्णी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. “एक सच्चा मित्र गमावला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.
