You are currently viewing महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे संस्थेचे पुरस्कार जाहीर

महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे संस्थेचे पुरस्कार जाहीर

*१०० कवींचा प्रातिनिधिक ४५० पानी काव्यसंग्रह होणार प्रकाशित*

 

पुणे: आषाढस्य प्रथम दिवसे कालिदास जयंती निमित्ताने दरवर्षी प्रमाणे गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी धायरी, पुणे येथे धारेश्वर कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे संस्थेचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी ज्येष्ठ लेखिका डॉ.शुभांगी भडभडे नागपूर यांना *जीवन गौरव पुरस्कार*, मा. डॉ.व्यंकटसाई चासलानी हडपसर(पुणे), कवीवर्य जयंत भिडे, ( पुणे) प्रा. डॉ.आर. एस. झुंजाराव ( पुणे) , पंडित डॉ. संजय गरुड धायरी (पुणे) , चित्रकार रवींद्र शिवदे ( सातारा ) व इतिहास अभ्यासक चंदकांत शहासने (पुणे). यांना *लक्षवेधी पुरस्कार* प्रदान करण्यात येणार आहेत.

महाकवी कालिदास जयंतीच्या निमित्ताने यावेळी महाराष्ट्रासह भारतातील इतर प्रांतातील मान्यवर निवडक १०० कवींच्या रचनांचा ४५० पानांचा प्रतिधिनिक राष्टीय काव्यसंग्रह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केला जाणार आहे. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष वि .ग. सातपुते (आप्पा) यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा