You are currently viewing कणकवली येथे उत्तम कांबळे यांचे २ जानेवारी रोजी व्याख्यान!

कणकवली येथे उत्तम कांबळे यांचे २ जानेवारी रोजी व्याख्यान!

कणकवली येथे उत्तम कांबळे यांचे २ जानेवारी रोजी व्याख्यान!

अखंड लोकमंच आयोजित ‘अखंड व्याख्यानमाले चे आयोजन

कणकवली:

कणकवली येथील ‘अखंड लोकमंच’ जिल्हा सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली नगरवाचनालयाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार,विचारवंत,साहित्यिक तथा दैनिक सकाळचे माजी समूह संपादक उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
अखंड समाज रचनेच्या निर्मितीसाठी लोकशाहीनिष्ठ मूल्यांचे संवर्धन व्हावे आणि समाजाभिमुख विचारधारा तळागाळात रुजावी यासाठी वैचारिक क्रांतीची मांडणी करणारी ‘अखंड व्याख्यानमाला’ गेल्यावर्षीपासून अखंड लोकमंच संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ‘जागतिकीकरण आणि सद्यस्थिती’या विषयावर उत्तम कांबळे हे विचारपुष्प गुंफणार आहेत. या व्याख्यानाच्या निमित्ताने उत्तम कांबळे हे कणकवली शहरात येत आहेत. कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने त्यांचे मौलिक विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखंड लोकमंच संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा