You are currently viewing कृषी प्रदर्शनातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदाच होणार !

कृषी प्रदर्शनातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदाच होणार !

१७, १८, १९ मे रोजी कुडाळमध्ये भव्य कृषि प्रदर्शन

कुडाळ

येत्या १७, १८ आणि १९ मे २०२२ रोजी कुडाळ येथील नवीन एसटी स्टँडच्या बाजूच्या मैदानावर भव्य कृषी प्रदर्शन होणार असून आज सकाळी याचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आ. वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, रुपेश पावसकर, राजू गवंडे, संजय भोगटे, राणे, संदीप म्हाडेश्वर, विद्यानंद आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रदर्शनाच्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, या भव्य कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनास राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कृषी प्रदर्शनातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदाच होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा