You are currently viewing महिलांच्या सुरक्षेसाठी नियुक्त समितीवर निकिता घाडीगांवकर यांची निवड

महिलांच्या सुरक्षेसाठी नियुक्त समितीवर निकिता घाडीगांवकर यांची निवड

मुंबई – महिलांच्या छळाच्या वाढत्या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने त्याच अनुषंगाने वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन भांडुप पोलिस ठाणे अंतर्गत तक्रार निवारण समिती नियुक्त करण्यात आली असून पो.नि. (जनसंपर्क) यांच्याशी समन्वय ठेवून महिलांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी श्री. दत्तात्रय खंडाळग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांडुप पोलिस ठाणे पश्चिम यांनी भारतीय जनता पक्ष भांडुप महिला मोर्चा अध्यक्षा सौ. निकिता नंदकुमार घाडीगांवकर यांची विशेष पत्र प्रदान नियुक्ती केली आहे. खरंतर सौ. घाडीगांवकर या कोणतेही पद नसताना सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महिला मोर्चा अध्यक्षापदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी विभाग ११५ मधून लोकांच्या जनसंपर्कात राहून समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. सौ. निकिता घाडीगांवकर यांची पोलिस समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याने भांडुप परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत असून योग्य निवड करण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. सौ. निकिता घाडीगांवकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंजवडे गावच्या रहिवाशी असून भांडुप कोकणनगर परिसरात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ओळख निर्माण केली आहे. या नियुक्तीमुळे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा