You are currently viewing एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सागरी सुरक्षा दलबाबत मार्गदर्शन….

एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सागरी सुरक्षा दलबाबत मार्गदर्शन….

मालवण

सागरी सुरक्षा मोहिमेच्या निमित्ताने स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, एनसीसी विभाग तसेच फिफ्टी महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग व सागरी सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमानाने एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सागरी सुरक्षा दल बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले व प्रात्यक्षिकेही करून दाखवण्यात आली. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सागरी सुरक्षा मोहीम नुकतीच पार पडली. २६/११ सारख्या सागरी मार्गाने भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्या सारख्या घटना घडू नयेत यासाठी सागरी सुरक्षा मोहीम घेण्यात आली. दोन दिवस रेड टीम व ब्ल्यू टीम असे दोन विभाग पाडून इंडियन नेव्ही , सागरी सुरक्षा दल व एनसीसी कॅडेट यांच्यावतीने संरक्षण संदर्भात सराव घेण्यात आला. यासाठी पीएसआय श्री. साठे, सागरी सुरक्षा दल, के. काळे, महाराष्ट्र बटालियन आर्मीचे सुभेदार गोविंद व लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत आदींनी विशेष प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 5 =