You are currently viewing मालवणातील दुसऱ्या ‘कार्डिअक’ रुग्णवाहिकेचे लोकार्पण..

मालवणातील दुसऱ्या ‘कार्डिअक’ रुग्णवाहिकेचे लोकार्पण..

मालवण
गंभीर स्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी संजीवनी ठरेल अश्या मालवणातील दुसऱ्या ‘कार्डिअक’ रुग्णवाहिकेचे लोकार्पण जेष्ठ डॉक्टर शशिकांत झांटये यांच्या हस्ते मालवण येथे करण्यात आले.

अँबुलन्स सेवेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे देवदूत
बनून दिवसरात्र सेवा देणाऱ्या गोट्या येरम या तरुणाने स्वखर्चातून ‘कार्डिअक’ रुगणवहिका उपलब्ध करून घेतलेला पुढाकार आदर्शवत असाच आहे. असे सांगत उपस्थितांनी कौतुक केले.

गंभीर स्थितीतील रुग्णांना अधिक उपचारासाठी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर कोल्हापूर, मुंबई यासह अन्य ठिकाणी नेण्यासाठी ‘कार्डिअक’ रुग्णवाहिका आवश्यक असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अश्या तीन रुग्णवाहिका आहेत. जिल्ह्यातील ही चौथी रुग्णवाहिका आहे. व्हेंटिलेटरसह अत्यावश्यक सर्व वैद्यकीय सुविधा यांची जोडणी रुग्णवाहिकेत आहे. रुग्णवाहिकेत वैद्यकीय कर्मचारी कायम उपलब्ध असणार आहे. तर आवश्यकते नुसार डॉक्टरही उपलब्द असणार आहेत.

रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी त्यांचे प्राण वाचावेत. हाच आपला मुख्य उद्देश आहे. त्यामुळे अत्यंत माफक दरात ही रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी तत्पर असेल. असेही गोट्या येरम यांनी सांगितले. ‘कार्डिअक’ रुग्णवाहिका सेवा उपलब्धतेसाठी मो. ९४२२१२११२८ या नंबरवर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले.

यावेळी डॉक्टर शशिकांत झांटये यांसह नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, आरोग्य सभापती पूजा सरकारे, बांधकाम सभापती यतीन खोत, गटनेते गणेश कुशे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पाटकर, व्यापारी महासंघ जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटये, डॉ. दर्शन खानोलकर, डॉ. अमोल झाटये, लोकमान्य सोसायटी व्यवस्थापक नितीन मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, मोहन वराडकर, राजा शंकरदास, महेश काळसेकर, प्रदीप कांबळी, गोपाळ लाड, संजय गोलतकर, जगदीश नार्वेकर, राम अवसरे, आबा अवसरे, दर्शन मयेकर, जीवन धुमाळ, केरकर यासह अन्य उपस्थित होते.

कोरोना काळातही तत्पर सेवा
कोरोना काळात अत्यावश्यक स्थितीत प्रसंगी रुग्णांना ने-आण करणे. मृतदेह आणणे व अंत्यसंस्कार यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून गोट्या यांने सेवा दिली व देत आहे. आपल्या तत्पर सेवेतून गोट्या यांने एक आदर्श निर्माण केला आहे. गंभीर रुग्णांना अतिजलद सेवा मिळण्यासाठी कार्डिअक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्याने घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =