You are currently viewing साहित्यिक विठ्ठल जाधव यांना पीएचडी पदवी 

साहित्यिक विठ्ठल जाधव यांना पीएचडी पदवी 

साहित्यिक विठ्ठल जाधव यांना पीएचडी पदवी
शिरूरकासार
           येथील साहित्यिक विठ्ठल जाधव यांना मराठी विषयात विद्यावाचस्पती (पीएचडी) ही पदवी प्राप्त झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठामध्ये ‘बालसाहित्याचा चिकित्सक अभ्यास – सन २००० ते २०१०’ या विषयावर अभ्यासपूर्ण संशोधन प्रबंध सादर केला. बीड येथील स्वा. सावरकर महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोपान सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण संशोधन कार्य पूर्ण केले.
      वर्तमान बालसाहित्यातील कथा, कादंबरी, कविता, नाट्य, चरित्र या अनुषंगाने सखोल मांडणी करून दुर्लक्षित बालसाहित्य विषयाकडे लक्ष वेधले आहे. विठ्ठल जाधव यांची पांढरा कावळा, बटाटीची धार, उंदरीन सुंदरीन, अटर का पटर ही बालसाहित्यातील ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. बाल साहित्यास महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कारही लाभला आहे. जाधव यांच्या संशोधनामुळे नविन लेखकांना दिशा मिळणार आहे. विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. दासू वैद्य यांनी मराठी बालसाहित्य प्रगल्भतेने साकारले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ. सूर्यकांत गीते,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी प्रबंधावर सखोल निरीक्षण नोंदविले. याकामी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे, डॉ. भाऊसाहेब नेटके यांचे सहकार्य त्यांना लाभले. तर एकनाथ आव्हाड, कैलास दौंड, सय्यद अल्लाउद्दीन, सतिष साळुंके, सुरेश सावंत यांचेसह मान्यवर लेखकांच्या बालसाहित्याचा विशेष अभ्यास केला. मराठवाडा साहित्य परिषद आणि संतपीठ पैठण येथे जाधव यांचा सन्मान करण्यात आला. गरीब परिस्थितीमुळे शिक्षण थांबले होते. पण जिद्द आणि चिकाटीने त्यांनी शिक्षण पूर्ण केले. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांमधून पहिलीच डॉक्टरेट पदवी त्यांना प्राप्त झाली आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी पीएचडी करून शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे त्यांनी सिद्ध केले आहे.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
———————————————–

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा