You are currently viewing आमदार नितेश राणे यांचा शिवसेनेला देवगड मध्ये दुसरा धक्का

आमदार नितेश राणे यांचा शिवसेनेला देवगड मध्ये दुसरा धक्का

चांदोशी ग्रामपंचायत सदस्यांनसह शेकडो कार्यकर्ते भाजपात

आमदार राणे यांच्या कार्यप्रणालीवर देवगडवाशीय प्रभावित…

कणकवली :

आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन दिवसेंदिवस शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपात  प्रवेश करत आहेत. आज देवगड तालुक्यात शिवसेनेला आणखीन एक भगदाड पडले. देवगड चांदोशी येथील शिवसेनेचे दोन ग्रामपंचाय सदस्य विजय तेली, संजीवनी घाडी यांच्या सह शेकडो शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. कणकवली येथे ओंगणेश निवस्थांनी हा पक्ष प्रवेश झाला.

यात चांदोशी गावच्या शिवसेनेचे ग्रा.पं.सदस्य विजय तेली, संजीवनी घाडी यांच्यासह  विलास धुरी, सलमान खान, प्रतीक सावंत, श्रीकांत सावंत, संभाजी धुरी, संभाजी मिराशी, महेश मेस्त्री, विलास मिराशी, संतोष चांदोसकर, रमेश जाधव, मधूकर थोटम, संजय मेस्त्री, शाम जाधव, सवेद मिराशी यांनी प्रवेश केला.

यावेळी भाजपा जिल्हा पदाधिकारी संदीप साटम, तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, पंचायत समिती सदस्य अजित कांबळे, माजी सभापती नंदू देसाई, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमित साटम, चांदोशी माजी सरपंच समीर मिराशी, बूथ अध्यक्ष दीपक मिराशी, ग्रामपंचायत सदस्य मंजिरी थोटम, वैभवी मिराशी, कार्यकर्ते सुर्थकांत मिराशी, मंगेश धुरी, मनोहर थोटम आदी उपस्थित होते.

या प्रवेशने आमदार नितेश राणेंनी सेनेला देवगडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी धक्का दिला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांनी देवगड ला जगाच्या नकाशावर आणले आहे. कोरोना काळात देवगडच्या आंबा बागायतदारांना हापूस विक्रीसाठी महिंद्रा, बिग बाजार चा प्लॅटफॉर्म दिला उपलब्ध करून दिला होता. कोरोनाच्या महामारीत आंबा बागायतदारांना आमदार नितेश यांनी दिलासा होता. नितेश राणेंच्या संकल्पनेतून आयोजित फिल्म महोत्सवाच्या माध्यमातून देवगडमध्ये अनेक सिने सिलेब्रिटी आले. साहजिकच देवगड तालुक्याचे निसर्गसौंदर्य पोचले जगभरात त्यांच्या या कामावर प्रभावित होऊन शिवसैनिक भाजपात प्रवेश करत आहे असे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.चांदोशी गावाचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होईल असा विश्वास सदस्य विजय तेली, संजीवनी घाडी यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =