You are currently viewing तळवडे बीएसएनएल सेवा सुरळीत होण्यासाठी तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे तसेच दूरसंचार विभागाकडे ‌ग्रामस्थांचे लेखी निवेदन सादर 

तळवडे बीएसएनएल सेवा सुरळीत होण्यासाठी तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे तसेच दूरसंचार विभागाकडे ‌ग्रामस्थांचे लेखी निवेदन सादर 

तळवडे बीएसएनएल सेवा सुरळीत होण्यासाठी तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे तसेच दूरसंचार विभागाकडे ‌ग्रामस्थांचे लेखी निवेदन सादर

देवगड :

देवगड तालुक्यातील तळवडे बीएसएनएल सेवा सुरळीत होण्यासाठी तळवडे ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे तसेच दूरसंचार विभागाकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

देवगड तालुक्यातील तळवडे येथील बीएसएनल सेवेचा बोजवारा उडाला असून त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.

येथील बीएसएनएल च्या नेटवर्क बाबत ग्रामस्थ सध्या नाराजी व्यक्त करत आहेत.सध्या ५ जी सीम कार्ड अथवा स्मार्ट फोन धारकच बीएसएनएल सेवेचा लाभ घेऊ शकत आहेत.या गावातील शेतकरी वर्ग तसेच बहुतांश नागरिक साधा फोन वापरत असल्यामुळे या गावात बीएसएनएल व्यतिरिक्त जनसंपर्कसाठी दुसरी कोणतीही साधना नसल्याने तळवडे तळेबाजार या ठिकाणी दूरसंचारच्या टॉवरमध्ये होणारी तांत्रिक अडचण बीएसएनएल सिम धारकांसाठी त्रासदायक व गैरसोयीचे ठरत आहे.

गेल्या महिनाभरापासून  गावातील बीएसएनएल या दूरध्वनी सेवेला आम्हाला नेटवर्क मिळत नाही आहे.आम्हाला आमच्या कामानिमित्त किंवा परगावी असलेल्या मुलांशी नातेवाईकां शी संपर्क साधता येत नसून बीएसएनएल सेवा लवकरात लवकर सुस्थितीत सुरू करावी या आशयाचे निवेदन यावेळी तळवडे ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.यावेळी तळवडे ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा