You are currently viewing विजघर येथील रस्त्यांची साईपट्टी खचली मात्र बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

विजघर येथील रस्त्यांची साईपट्टी खचली मात्र बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

दोन दिवसात उपाययोजना न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला घेराव – मदन राणे

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात पुन्हा पाऊसाने मुसंडी मारली असून गावातील काही नदी पात्रे पाण्याने तुडुंब भरलेली आहे.त्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळित झालेले आहे.
विजघर येथे पाण्याचा प्रवाह थेट रस्त्यावर आल्याने बाजुचा रस्ता पुर्णपणे वाहुन गेला असुन अपघात होण्याची दाट शक्यता आहे.वारंवार सुचेना देवुनही संबंधित विभाग कानाडोळा करत आहे.मात्र याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे.त्याचबरोबर रस्त्याला लागुन असलेली झाडे रस्त्यावर पडली असुन वाहनधारकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.या संपूर्ण घडलेल्या प्रकाराची माहिती संबंधित विभागाला दिली असुन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.असे या चित्रावरुन दिसून येत आहे.संबंधित ठीकाणी अपघात घडल्यास आणि यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास दोन दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाला स्थानिक ग्रामस्थासोबत कार्यालयाला घेराव घालून जाब विचारण्यात येईल असा इशारा युवासेना तालुका प्रमुख मदन राणे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा