वेंगुर्लेमध्ये सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी २० ग्रामपंचायती आरक्षित..

वेंगुर्लेमध्ये सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी २० ग्रामपंचायती आरक्षित..

वेंगुर्ला

वेंगुर्ला खुल्या वर्गासाठी २० ग्रामपंचायती आरक्षित आहेत यात १० ग्रामपंचायत सर्वसाधारण महिलासाठी यात तुळस, पाल, आडेली, परुळेबाजार, वेतोरे, चिपी, वजराठ, मठ, शिरोडा, भोगवे ग्रामपंचायत तर सरपंच पद सर्वसाधारण मेढा, कुशेवाड़ा,आरवली, सागरतीर्थ, अणसुर,पालकरवाडी, रेडी , खानोली, वायंगणी ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षित त्यानंतर आरक्षणाची सांगता झाली.

यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे,नायब तहसीलदार शिंदे, संतोष बांदेकर यांच्या सहित तालुक्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी आरक्षण सोडत प्रक्रिये दरम्यान महिला आरक्षण वरून आक्षेप घेण्यात आला. गेली १५ वर्षे सतत महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायतीत पुन्हा महिलांनाच आरक्षण कसे? यावरून पेंडुर माजी सरपंच संतोष गावडे, होडावडा सामाजिक कार्यकर्ते  राजबा सावंत यांनी आक्षेप घेतला

प्रतिक्रिया व्यक्त करा