अंगणवाडी सेविका पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अंगणवाडी सेविका पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

एकात्मिक बाल विकासकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय, कुडाळ अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या मानधनी पदांसाठी दिनांक 01 एप्रिल 2021 रोजी पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत.

रिक्त असणारी पदे पुढील प्रमाणे आहेत. ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र व रिक्त पद यांची माहिती अनुक्रमे दिली आहे. वालावल मुड्याचे कोन, वालावल बंगेवाडी मिनी अंगणवाडी सेविका ,माणगाव,- माणगाव मुस्लिमवाडी मिनी अंगणवाडी सेविका, तसेच आंजिवडे,- आंजिवडे मिनी अंगणवाडी सेविका, या प्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत.

सदर पदांसाठी अर्ज करणाताना अर्जदार हा संबंधित ग्रामपंचायत महसुली गावातील असणे अवश्यक आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय,कुडाळ येथे समक्ष सादर करावेत. अर्जा सोबत लहान कुटुंबाबातचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे.  सदर पदांसाठीची वयोमर्यादा ही 21 ते 30 वर्षे आहे. तसेच शैक्षणिक पात्रता 10 उत्तीर्ण असवा,तसेच रहिवासी दाखला, वयाचा दाखला,अनुभव या विषयीची कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

शासकीय संस्थेत राहत असलेली विधवा व अनाथ मुली यांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प,कुडाळ  यांच्यशी संपर्क साधावा असे आवाहन एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी,कुडाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा