You are currently viewing सृष्टी….(षडाक्षरी)

सृष्टी….(षडाक्षरी)

‌ *जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सृष्टी….*(षडाक्षरी)

 

ढगाळ आभाळ,

सकाळच्या वेळी!

मेघांना वेढून ,

हवा पावसाळी !…१

 

चाहूल वर्षेची,

संपला उन्हाळा!

अचानक वाजे ,

पावसाचा वाळा!…२

 

ऊन पावसाचा ,

खेळ सुरू झाला!

सृष्टीच्या रंगात ,

माणूस भिजला !….३

 

नकळत दिली,

निसर्गाने छाया!

किमया वर्षेची ,

आतुर पहाया !…..४

 

ऋतू चक्रा मध्ये,

मनस्विनी सृष्टी !

न्याहाळीत आहे,

तिची चमत्कृती !….५

 

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा