नजरेची भाषा

नजरेची भाषा

ऐकत नाही म्हणून सांगायचे सोडून द्यायचे का,
पाश मायेचे आवळून त्यात गुरफटून ठेवायचे का.

प्रेम मनातले बाहेर कधी दाखवून द्यायचे नाही,
मन रडल्यावर आसवांनी डोळ्यात जमायचे का.

अपेक्षा अशाच असतात उंच उंच वाढणाऱ्या,
अपेक्षा अपूर्ण राहिल्या म्हणून त्या असूच नयेत का.

ठेच पायाला लागली तरी सनक डोक्यात जाते,
एका हृदयाच्या भावना दुसऱ्यास कळूच नयेत का.

शब्द मुके झाले तरी नजर सारं बोलून जाते,
नजरेला नजरेची भाषा….. आज नवीच आहे का…
आज नवीच आहे का…

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा