You are currently viewing सातार्डा उत्तम स्टील कंपनी आवारात पट्टेरी वाघाचे दर्शन

सातार्डा उत्तम स्टील कंपनी आवारात पट्टेरी वाघाचे दर्शन

सातार्डा उत्तम स्टील कंपनी आवारात पट्टेरी वाघाचे दर्शन

परिसरात घबराटीचे वातावरण

बांदा

सातार्डा उत्तम स्टील कंपनी आवारात आज सकाळी गोव्यात कामानिमित्त जाणाऱ्या युवकांना पट्टेरी वाघ निदर्शनास आला. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे मात्र सातार्डा परिसरात पट्टेरी वाघ असल्याच्या बातम्यांना पुष्टी मिळाली आहे.

आज सकाळी मडूरा येथील अभय परब व कास येथील सिताराम भाईप हे दुचाकीने गोव्यात कामानिमित्त जात होते. उत्तम स्टील आवारात त्यांना पट्टेरी वाघ पायवाटे नजीक बसलेला निदर्शनास आला. यावेळी त्यांची भीतीने घाबरगुंडी उडाली. मोठ्या शिताफीने माघारी परतून अन्य पर्यायी मार्गाने ते गोव्यात कामाला गेले.

गेली दोन वर्षे सातत्याने या भागात पट्टेरी वाघ स्थानिकांच्या नजरेस पडत आहे. वनविभाग मात्र या भागात पट्टेरी वाघ नसल्याची माहिती देत आहे. पट्टेरी वाघासह बिबट्यांची संख्याही या परिसरात लक्षणीय आहे. वनविभागाने पट्टेरी वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा