You are currently viewing कलमठ गाव मर्यादित नरकासुर स्पर्धेत संकल्प मित्रमंडळाचा प्रथम क्रमांक

कलमठ गाव मर्यादित नरकासुर स्पर्धेत संकल्प मित्रमंडळाचा प्रथम क्रमांक

कणकवली :

कणकवलीतील कलमठ गाव मर्यादित नरकासुर स्पर्धेत संकल्प मित्रमंडळ, कलमठ लांजेवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. कलमठ सरपंच संदीप मेस्त्री मित्रमंडळातर्फे कलमठ बाजारपेठ येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

भालचंद्र मित्रमंडळ, कुंभारवाडीला द्वितीय तर इस्वटी मित्रमंडळ, कोष्टीवाडीला तृतीय क्रमांक मिळवला. गोरक्षनाथ मित्रमंडळ, गोसावीवाडी व साई गणेश मित्रमंडळ बिडयेवाडी यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. स्पर्धेत १० संघांनी सहभाग होता.

कलमठ बाजारपेठ पार पडलेल्या नरकासुर स्पर्धेत महाकाय व आक्राळ विक्राळ नरकासुर प्रतिमा स्पर्धकांनी आणल्या होत्या. या प्रतिमा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. स्पर्धेच्यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री,माजी उपसभापती तथा भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रा. पं. सदस्य नितीन पवार, सुप्रिया मेस्त्री, पप्पू यादव, बाबू नारकर, परेश कांबळी, आबा कोरगावकर, दिनेश गोठणकर, श्रेयश चिंदरकर, ऋत्विज राणे, विजय इंगळे, सोहेल खान, प्रवीण सावंत, प्रथमेश धुमाळे आदी उपस्थित होते. यशस्वी संघांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी समीर कवठणकर, स्वरुप कोरगावकर, दिनार लाड, सचिन वाघेश्री, प्रथमेश कळसुलकर, विराज मेस्त्री, साहिल लाड यांनी मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा