You are currently viewing कौशल विकास योजनांचा फायदा घेऊन आत्मनिर्भर बना

कौशल विकास योजनांचा फायदा घेऊन आत्मनिर्भर बना

प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई, जिल्हा सरचिटणीस, भाजपा यांचं निवेदन

वेंगुर्ले

केंद्र सरकारच्या स्कील डेव्हलमेंट ऑफ इंडिया या उपक्रमा अंतर्गत युवा परिवर्तन संस्थेमार्फत वेंगुर्ले तालुक्यामध्ये लाॅकडाऊनच्या काळात कोवीड च्या सर्व नियमांचे पालन करत मेणबत्ती, बेसीक केक, ॲडव्हान्स केक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात १०८ महीलांनी सहभाग घेतला होता. या शिबिरार्थींना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम प्रसंन्ना देसाई यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर युवा परिवर्तन संस्था सिंधुदुर्गचे डेव्हलमेंट मॅनेजर दत्तात्रेय परूळेकर, कार्यक्रम अधिकारी विवेक नाईक, जगदीश उगवेकर, सतीश गवस, सहदेव खोत, शिवानंद प्रभु, किशोर खानोलकर, प्रकाश पालयेकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक व युवतींना रोजगाराची संधी मिळावी म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून पंडित दिनदयाळ उपाध्याय कौशल विकास योजनेतून रोजगाराभिमुख प्रशिक्षण वेगवेगळ्या क्षेत्रात सुरु केले आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त तरुण – तरुणींनी घेऊन आत्मनिर्भर बनावे असे आवाहन केले. तसेच युवा परिवर्तन ही संस्था एक रोजगाराभिमुख व्यवसाय प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्हामध्ये आयोजित करत आहे ही एक समाधानाची बाब आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करावे व त्यासाठी लागणारे सहकार्य करु असे अभिवचन प्रसंन्ना देसाई यांनी दिले. यावेळी युवा परिवर्तन संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणी व महिलांनी आपली मनोगते व्यक्त करुन रोजगाराचे दालन खुले करुन दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =