You are currently viewing आरवली येथे मूळदे उद्यानविद्या महाविद्यालय कृषि विद्यार्थिनींचे अळंबी उत्पादनाविषयी मार्गदर्शन

आरवली येथे मूळदे उद्यानविद्या महाविद्यालय कृषि विद्यार्थिनींचे अळंबी उत्पादनाविषयी मार्गदर्शन

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथे उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम, आरवली अंतर्गत अळंबी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम सौ. नेहा दळवी यांच्या निवासस्थानी घेण्यात आला. यावेळी कृषि विद्यार्थिनींनी अळंबी उत्पादनातून उपस्थितांना रोजगाराच्या दिशा दाखवल्या. उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे तर्फे आयोजित या अळंबी प्रशिक्षणला चांगला प्रतिसाद लाभला.

कृषि विद्यार्थिनींनी यावेळी अळंबी उत्पादनासाठी लागणारे साहित्य, अळंबी बियाणे उपलब्ध करून दिले. यावेळी अळंबी उत्पादनाची पद्धत, त्यासाठी घेतली जाणारी विशेष काळजी याबद्दलची सर्व माहिती उद्यानविद्या महाविद्यालयाच्या कृषि कन्यांनी दिली. तसेच अळंबी उत्पादनातून रोजगाराच्या संधी कश्या उपलब्ध होवू शकतात हे देखिल या प्रशिक्षणात सर्वांना सांगण्यात आले.

आरवली गावचे सरपंच श्री तातोबा कुडव, ग्रामपंचायत सदस्य, सर्व महिला बचतगट मधील महिला प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषि विद्यार्थिनींनी कु. स्वरांगी करंदीकर, कु. सृष्टी पालव, कु. सायली वाघमोडे, कु. समिक्षा वायंगणकर, कु. मानसी आढाव, कु. पूजा पवार, कु. मनाली भगत यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =