You are currently viewing सुदृढ आरोग्यासाठी बॅटमिंटन हा उपयुक्त खेळ – समीर नलावडे…

सुदृढ आरोग्यासाठी बॅटमिंटन हा उपयुक्त खेळ – समीर नलावडे…

मॉर्निंग क्लब कणकवली आयोजित तालुकास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेचा शुभारंभ ; क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली

सुदृढ आरोग्यासाठी बॅटमिंटन हा उपयुक्त खेळ आहे. जगात कोरोनाची महामारी आल्यानंतर तंदुरुस्त आरोग्याचे महत्व प्रत्येकाला पटू लागले आहे. मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती बॅटमिंटन खेळातून मिळेल. असे प्रतिपदन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. मॉर्निग क्लब कणकवली आयोजित तालुकास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेचा शुभारंभ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. नगरपंचायत बहुउद्देशीय हॉल येथे आयोजित स्पर्धेवेळी जेष्ठ बॅटमिंटन पट्टू बाळासाहेब गणपत्ये, रमेश जोगळे, मिर्निग क्लबचे अध्यक्ष बंडू गांगण, व्यापारी आनंद पोरे, संदीप ठाकूर, संतोष कांबळी आदी स्पर्धक व पालक उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे व जेष्ठ बॅटमिंटन पट्टू बाळासाहेब गणपत्ये यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत १५ वर्षाखालील एकेरी तसेच १५ वर्षांवरील एकेरी व दुहेरी खुल्या गटात मिळून ५० हुन अधिक या स्पर्धेला बाल क्रीडारसिकाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. पहिला सामना तेजस गावकर विरुद्ध शुभंकर कुबल याच्यात खेळवण्यात आला. १५ सेटच्या गुणात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात तेजस गावकर याने खेळाचे सुंदर प्रदर्शन करत विजयी मिळवत. पुढील सामन्यात प्रवेश घेतला. या स्पर्धेत पंच म्हणून सर्वेश राणे यांनी काम पहिले.

शनिवार व रविवार या दोन दिवसात खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी रात्री होणार असून विजयी खेळाडूला रोख रक्कम व चषक,तर सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. हि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मनीष कर्पे, आशुतोष मसुरकर, ओंकार कडू, कौस्तुभ बेळेकर, अथर्व पोरे आदी मेहनत घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा