You are currently viewing सावंतवाडीतील आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी नगर विकास सचिवांची भेट घेणार – राजन तेली

सावंतवाडीतील आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी नगर विकास सचिवांची भेट घेणार – राजन तेली

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे तब्बल ६१ सदस्य बिनविरोध…

सावंतवाडी

येथील नगरपालिकेच्या हद्दीत आरक्षित असलेल्या जागा घेण्यासाठी जवळपास तीनशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे जी महत्त्वाची आरक्षणे आहेत त्यासाठी पैशाची तरतूद करण्यासाठी लवकरच नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह नगर विकास प्रधान सचिवांची भेट घेऊन मागणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.तर शासन नगर पालिकेला सातवा वित्त आयोग लागू करत असताना नगरपालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेत नाही. आज पगार आणि पेन्शन द्यायलाही पालिकेकडे पैसे उरत नाही. त्यामुळे सरकारने पालिकांना अतिरिक्त मदत करण्याची गरज असल्याचेही श्री तेली म्हणाले. पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहांमध्ये आज राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब,शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, अमित परब,केतन आजगावकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. तेली पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये देवगड वैभववाडी तालुक्यात भाजपाच्या दोन ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या, तर तब्बल ६१ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा एकंदरीत कल लक्षात घेता जास्तीत जास्त निवडणुका वर भाजपाचे कमळ फुले असे चिन्ह आहे.तर सावंतवाडी शहरामध्ये जवळपास ६९ ठिकाणच्या जागेत आरक्षणे निश्चित आहेत. हे आरक्षणे असलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून घ्यायचे झाल्यास त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. मात्र असे असले तरी ज्या ठिकाणी क्रीडांगण उद्यान व अन्य महत्त्वाची आरक्षणे आहे. त्या जमिनी घेण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. ही तरतूद करण्यात यावी, यासाठी लवकरच आपण नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह नगर विकास प्रधानमंत्री यांची भेट घेऊन मागणी करणार आहोत, शहरातील ही आरक्षणे वर्षानुवर्षे तसेच पडून राहत आहेत. कोर्टाकडून शेतकऱ्यांना नोटिसा निघतात आणि त्याचा भुर्दंड हे शेतकऱ्यांना सोसावा लागतो. त्यामुळे यावर तोडगा निघणे महत्त्वाचे आहे.
श्री तेली पुढे म्हणाले, केंद्राच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ उद्या जिल्हा भाजपतर्फे कणकवलीत ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या हिताच्या असलेल्या या मोर्चात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.केंद्राच्या कृषी विधेयकाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात झाला. देवगडचे आमदार नितेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आंबा थेट मॉल व डी मार्ट विक्रीसाठी पाठवला गेल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 4 =