मुंबई :
मूळ कोकणवासीय (मसुरे, मालवण, सिंधुदुर्ग) आणि सध्या डोंबिवली स्थित असलेले प्रसिद्ध कवी विजो (विजय जोशी) यांच्या ‘टोपीवाले फुगे’ या बालकविता संग्रहाला राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा ‘अंकुर साहित्य संघ अकोला, यांचा बालवाङ्मय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
‘टोपीवाले फुगे’ या बालकविता संग्रहाला मिळालेला या वर्षीचा हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. याबद्दल साहित्य वर्तुळात कवी विजो यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कवी विजय जोशी(विजो) यांचे साहित्य क्षेत्रात आदराने नाव घेतले जाते. यापूर्वी देखील त्यांचे “ओंजळ”, “मनतरंग”, “अंतःस्थ मनात”, “अंतरंगाचे तरंग”, इत्यादी कवितासंग्रह प्रकाशित झाले असून “वृत्तबद्ध कविता ते गझल(तंत्र आणि मंत्र)” हे वृत्तबद्ध कविता आणि गझल अभ्यासाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
▪️▪️▪️