You are currently viewing पद्मश्री परशुराम गंगावने यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले

पद्मश्री परशुराम गंगावने यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले

पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील कळसुत्री बाहुल्या व ठाकर आदिवासी कलांचे जतन करणारे पद्मश्री परशुराम गंगावने यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आज आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केले. श्री. गंगावने यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज पिंगुळी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.

            यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर यांच्यासह गंगावणे कुटुंबिय व पिंगुळी – गुढीपूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            गेली 50 वर्ष कळसुत्री बाहुल्यांची कला, चित्रकला यासह ठाकर आदिवासी कला जोपासणारे पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणजे जिल्ह्याला लाभलेलं देणं असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, श्री. गंगावणे यांचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याप्रती असलेल्या निष्ठेला मिळालेला न्याय आहे. लोककला म्हणजे आपल्यासाठीचा एक ठेवा आहे. हा ठेवा गेली पन्नास वर्ष श्री. गंगावणे जोपासत आहे. त्यांची पुढील पिढीही हा ठेवा जपण्याचे काम करत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज पद्मश्री पुरस्काराने श्री. गंगावने यांचा सन्मान होत आहे. जिल्ह्यासाठी ही ऐतिहासीक अशी घटना आहे. आज त्यांच्या रुपाने जिल्ह्याला दुसरे पद्मश्री लाभले असल्याचे श्री. सामंत म्हणाले.

            यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते पद्मश्री परशुराम गंगावणे आणि त्यांचे कुटुंबिय यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =