You are currently viewing “आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार”

“आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करणार”

“आमदार नाईक यांनी राज्याचे नेतृत्व करावे अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची ईच्छा”

-शिवसेना नेते संदेश पारकर

आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस येत्या २६ तारखेला विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जाणारे नाईक हे जिल्ह्याचे नेतृत्व करत असून त्यांनी आता राज्याचे नेतृत्व करावे अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे मत शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. शिवसेना शाखा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, अँड.हर्षद गावडे, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, संदेश पटेल, मंदार केणी, यतीन खोत, बाळू नाटेकर, उमेश मांजरेकर, शीला गिरकर, दीपा शिंदे, तृप्ती मयेकर, पूनम चव्हाण, नीलम शिंदे, अंजना सामंत, आकांक्षा शिरपुटे, विद्या फर्नांडिस, प्रसाद आडवणकर, बाबा मोरजकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते.
पारकर पुढे सांगितले की आमदार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ तारखेला दुपारी साडे तीन वाजता अपंग बांधवांना व्हीलचेअरचे वाटप, मच्छीविक्रेत्या महिलांचा सत्कार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षा स्टँड, देवालये, वाचनालये यांना थर्मल गन, ऑक्सिमिटरचे मोफत वितरण केले जाणार आहे. याचबरोबर शहर परिसरातील विविध विकासकामांची भूमीपूजने केली जाणार आहेत.
आमदार नाईक यांनी मतदार संघाला न्याय देताना सुमारे १३० कोटीचा आराखडा मंजूर केला आहे. यात रस्त्यांच्या कामांसह अन्य कामांचा समावेश आहे. मतदार संघातील विविध समस्या सोडविताना सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम आमदार नाईक यांनी केले आहे. अशा या झुंझार, लढाऊ नेतृत्वाचा शिवसेनेच्यावतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अटी, शर्तीचे पालन करून हे कार्यक्रम पार पडणार आहेत असेही श्री. पारकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा