You are currently viewing कुडाळ येथे गौड समाजाचा २६ फेब्रुवारीला स्नेह व वधू-वर मेळावा…

कुडाळ येथे गौड समाजाचा २६ फेब्रुवारीला स्नेह व वधू-वर मेळावा…

कुडाळ

गौड सारस्वत ब्राह्मण समाज सिंधुदुर्गचा यावर्षीचा ज्ञातीबांधव स्नेह मेळावा व वधूवर मेळावा रविवार २६ फेब्रुवारीला कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल, स्टेशन रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. गौड सारस्वत ब्राह्मण समाज सिंधुदुर्ग ही सन १९९७ साली स्थापन झालेली सारस्वत ज्ञातीबांधवांची संस्था असून दरवर्षी स्नेह मेळावा व वधूवर मेळाव्याचे आयोजन करते.


पहिल्या सत्रात या मेळाव्यात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन, सारस्वत ज्ञातीतील डॉक्टर, वकील, इंजीनियर, शिक्षण तसेच व्यापार, उद्योग या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार, सिंधुदुर्ग सारस्वत मित्र पुरस्कार तसेच ५० वर्षे वैवाहिक जीवनास झालेल्या ज्ञातीतील दांपत्यांचा सत्कार वितरण, मान्यवरांची मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सारस्वत ज्ञातीतील डॉक्टर, वकील, इंजीनियर, शिक्षण तसेच व्यापार, उद्योग या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या व्यक्तींची तसेच सारस्वत ज्ञातीतील वैवाहिक जीवनास ५० वर्षे झालेल्या दांपत्यांची नावे संस्थेचे सचिव श्री. संतोष पई ९४२३२६७०१८ यांच्याकडे देण्यात यावीत.
दुसऱ्या सत्रात सारस्वत ज्ञातीतील वधुवरांसाठी वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्या वधुवरांना नाव नोंदणी करावयाची असतील त्यांनी श्री. अनंत खांडाळेकर ९४०३२२७८४१ यांच्याशी संपर्क साधावा.
सदर मेळावा यशस्वी करण्याकरिता गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी, तालुका उपसमिती पदाधिकारी कार्यरत असून या मेळाव्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गौड सारस्वत ब्राह्मण समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन संस्थेने अध्यक्ष श्री. चंद्रकांत नाडकर्णी व सचिव श्री. संतोष पई तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी केले आहे.

 

🫘🫘* सुनंदाई कृषी उद्योग* 🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + eight =