You are currently viewing युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचा उद्या रक्तदान आंदोलनाचा निर्णय

युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचा उद्या रक्तदान आंदोलनाचा निर्णय

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय होण्यासाठी शांत, संयमी आंदोलन करावे असे आवाहन

सावंतवाडी
गेली काही वर्ष जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व्हावे यासाठी जनतेमधून होत असलेली मागणी आणि या मागणीवर लोकप्रतींधिनीनी केलेले दुर्लक्ष आणि दिलेली आश्वासने याविरोधात जिल्ह्यातील युवकांनी एक अनोखे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी रक्तदान आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, या दिवशी मोठ्या प्रमाणात युवकांनी रक्तदान करून अनेकांचे जीव वाचवण्याचा कार्याबरोबरच जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय होण्यासाठी शांत, संयमी असे आंदोलन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या आधी कधीच जिल्ह्यात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे सकारात्मक आंदोलन कधीच करण्यात आले नसून, या आंदोलनानंतर तरी सरकारला जाग येते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हे आंदोलन दंडावर काळी पट्टी बांधून करण्यात येणार असून, या आंदोलनाला विविध रक्तदान संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच या आंदोलना नंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी अशी आंदोलने होणार असल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहत रक्तदान करून या कठीण काळात असलेला रक्ताचा तुटवडा भरून काढताना त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग लवकरात लवकर व्हावे यासाठी मागणी करण्यासाठी शांतीच्या मार्गाने एकत्र येऊया असे देखील ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्यानेच शिरोडा येथील नियमित रक्तदाते सुरेंद्र करंगुडकर याना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच डॉ अभिजित चितारी याना लवकरच उपजिल्हा रुग्णालयात रुजू करावे अशी मागणी देखील देव्या सूर्याजी यांनी केली आहे. हे आंदोलन उद्या १ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० पासून सुरु होणार असून सावंतवाडी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत होणार आहे. अशी माहिती देव्या सूर्याजी यांनी यावेळी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + nineteen =