You are currently viewing श्री लईराई जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीतील दोडामार्ग तालुक्यासह जिल्ह्यातील जखमी धोंडाना आर्थिक मदत करा

श्री लईराई जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीतील दोडामार्ग तालुक्यासह जिल्ह्यातील जखमी धोंडाना आर्थिक मदत करा

*श्री लईराई जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीतील दोडामार्ग तालुक्यासह जिल्ह्यातील जखमी धोंडाना आर्थिक मदत करा : बाबुराव धुरी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिवसेना(उबाठा ) जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी जखमी “धोंड” यांची रुग्णालयात जातं भेट घेतं केली विचारपुस*

*दोडामार्ग

शिरगांव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाली, या उत्सवात दोडामार्ग तालुक्यातील भाविकांसह, व्रतस्थ धोंड मोठ्या प्रमाणात सहभागी असतात, या चेंगरा चेंगरीत दोडामार्ग तालुक्यातील अनेक धोंड तसेच भाविक जखमी झाले, या जखमीवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत, यातील म्हापसा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जातं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी तथा युवासेना पदाधिकारी भिवा गवस यांनी भेट घेतं विचारपूस केली व त्यांना धीर देत मदतीचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना बाबुराव धुरी यांनी सदरची घटना निश्चितच दुःख दायक असून अशा मोठ्या जत्रोत्सवात गोवा शासनाचे योग्य नियोजन नसल्याने हा प्रकार घडला का? यासाठी उच्चं स्तरीय कमिटी नेमून चौकशी व्हावी तसेच महाराष्ट्र सरकारने याकडे विशेष लक्ष देवून महाराष्ट्रातील जखमी धोंड व भाविक यांना आर्थिक सहकार्य करावें असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा