You are currently viewing *गेल्या वर्षात खडसे , सरनाईक , यांच्यासह ‘या’ नेत्यांनाही आल्या आहे  ईडीच्या नोटिसेस*

*गेल्या वर्षात खडसे , सरनाईक , यांच्यासह ‘या’ नेत्यांनाही आल्या आहे ईडीच्या नोटिसेस*

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या नोटीशीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झाले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते भाजपवर या मुद्द्यावरून जोरदार टीका करत आहे.२०१९ मध्ये खासदार शरद पवार यांना देखील काही महिन्यांपूर्वी ईडीने नोटीस पाठवली होती त्यावेळेपासून भाजपवर सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप होत आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण आतापर्यंत काही प्रमुख नेत्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना ईडीने नोटीस पाठवली त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

 

एकनाथ खडसे

पुण्यात भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील खडसेंच्या काही सर्मथकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असंही खडसे यांनी म्हटलं होतं. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना 2016 मध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

 

प्रताप सरनाईक

टॉप सिक्युरिटी घोटाळाप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयवर धाडी टाकल्या होत्या. या धाडीमध्ये प्रताप सरनाईक यांचा मोठा मुलगा विहंग सरनाईक याला ईडीने चौकशी करता ताब्यात घेतलं होतं. जवळपास पाच तास विहंग सरनाईक यांची चौकशी केली. सरनाईक कुटुंबीयांचे निकटवर्तीय अमित चांडोले यांना चौकशी करून ईडीने अटक केली होती.

 

वर्षा राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या देखील ईडी च्या रडारवर आहेत. 55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे, ज्यात वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले होते. ईडीने त्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते.

 

प्रफुल्ल पटेल

दाऊदचा हस्तक इकबाल मिर्ची व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्यात झालेल्या जमीन व्यवहारप्रकरणी ईडीने इक्बाल मिर्चीचा हस्तक हुमायून मर्चंटला पोलिसांनी अटक केली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफल्ल पटेल हे देखील या ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या इक्बाल मिर्चीबरोबर कथित आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप पटेलांवर आहे. या प्रकरणी ईडीने प्रफल्ल पटेलांना नोटीस बजावली होती. त्यानुसार पटेल ईडी कार्यालयात हजर झाले होते.

 

स्वप्नाली कदम

कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे.विदेशी चलन प्रकरणात अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. अविनाश भोसले यांची २७ नोव्हेंबर २०२० रोजी ईडीने तब्बल दहा सात चौकशी केली होती. FEMA या कायद्यांतर्गत चौकशी करण्यात आली होती. यापूर्वी आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील २३ ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या. दरम्यान आता स्वप्नाली कदम यांना इडीची नोटीस आल्याने विश्वजीत कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा