You are currently viewing अखिल महाराष्ट्र साहित्य मंच आयोजित लावणी महोत्सव थाटात संपन्न

अखिल महाराष्ट्र साहित्य मंच आयोजित लावणी महोत्सव थाटात संपन्न

 

अखिल महाराष्ट्र साहित्य मंचचा ऑनलाईन लावणी महोत्सव शनिवार दिनांक 23 एप्रिल रोजी थाटात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रिया मयेकर यांनी भूषवले.प्रास्ताविक अशोक कांबळे यांनी केले तर प्रखर व तेजस्वी प्रतिभेची झलक ज्यांच्या व्यक्तिमत्वात व वक्तृत्वात पाहण्यास मिळते असे अ म सा मंचचे सर्वेसर्वा योगेश चाळके यांनी दहा दिशांना लावण्याची झळाळी देत त्यांचे महत्व आपल्या प्रभावी सुत्रसंचलनाच्या माध्यमातून गुंफले. सुनीता पाटील बारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळ व बहुजन विकास प्रतिष्ठान लिंगदेव संचलित विश्वरत्न कलावंत संस्थेने देखील अ म सा मंचचे कौतुक केले व करत असलेल्या कार्याची दखल घेत कौतुकाची थाप दिली.सदर महोत्सवात सिंधुताई बोदले, प्रिया भालके,अशोक कांबळे,स्वाती काळे,ज्योती अहिरे, रेखा देशमुख,प्रिया मयेकर,विलास कुलकर्णी, राजेश नागुलवर आदींनी शृंगारिक,प्रबोधनात्मक,विड्याची लावणी,बैठकीची लावणी, विनोदी लावणी तसेच भक्तिरसात न्हाऊन निघालेली वेगळ्याच धाटणीची सुरेख अशी लावणी सादर केली.
कार्यक्रमाच्या शेवटी श्रीम स्वाती काळे यांनी अ म सा मंचच्या पंच कमिटीच्या व समूहाच्या वतीने लावणीकरांचे व रसिक श्रोत्यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा