You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या वतीने मळगाव येथे ड्रग्स विरोधी मोहिमेंतर्गत जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या वतीने मळगाव येथे ड्रग्स विरोधी मोहिमेंतर्गत जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसांच्या वतीने चालू असलेल्या ड्रग्स विरोधी मोहीम अंतर्गत आज रोजी मळगाव गावात  प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीसाठी नागरिक व विद्यार्थी हजर होते. प्रभात फेरी झाल्यानंतर ड्रग्स विरोधी शपथ घेण्यात आली.

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी मळगाव येथील नागरिकांना ड्रग्स विरोधी महिमेसंदर्भात मार्गदर्शन व अमली पदार्थ समूळ उच्चाटनासाठी सहकार्याचे आवाहन केले.

यावेळी सरपंच हनुमंत पेडणेकर, तसेच गावातील ग्रामस्थ, महिलावर्ग, शालेय विद्यार्थी, आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा