You are currently viewing मालवण मनसेने केले नगरपरिषद,ग्रामपंचायतींना पीपीई किट, फेसमास्क, फेसशिल्ड, हँडग्लोव्हजचे वाटप

मालवण मनसेने केले नगरपरिषद,ग्रामपंचायतींना पीपीई किट, फेसमास्क, फेसशिल्ड, हँडग्लोव्हजचे वाटप

मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर यांचा पुढाकार

तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता मनसे पदाधिकारीही सरसावले

मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री सेवाधाम ट्रस्टचे विश्वस्त डॉ.मनोज चव्हाण आणि मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर यांच्यावतीने मालवण नगरपरिषद तसेच तालुक्यातील कुंभारमाठ, हडी, वडाचापाट, पोईप, मसदे विरण, मालोंड या ग्रामपंचायतींना पीपीई किट, फेसमास्क, फेसशिल्ड, हँडग्लोव्हज अशा किटचे वाटप नुकतेच करण्यात आले.तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता मनसे कडून वाटप करण्यात आले.

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव,तालुका सचिव विल्सन गिरकर, शैलेश अंधारी, भारती वाघ, विनायक गावडे, नितिन खानोलकर, गोपाळ शेलटकर, लक्ष्मण पालव, नवनाथ घाडी, सचिन माडये, राजेश पालव, बबलू वेंगुर्लेकर, संदिप सातार्डेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा