त्या बाळाला दात्यांनी दिले जीवदान यशस्वी शस्त्रक्रिया होऊन तो बाळ सुखरूप घरी परतला.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश.
सावंतवाडी
गेली सहा वर्ष एका दुर्गम आजाराशी झुंजत असणाऱ्या कुडाळ तुळसुली येथील त्या बाळाला दात्यांनी पुनर्जन्म दिला असं म्हणायला हरकत नाही.डोक्याच्या ऑपरेशनवेळी डोक्यामध्ये बसवणाऱ्या त्या पाईपची किंमत जवळपास 90 हजार रुपये होती. परंतु दुर्दैव असे की त्यांच्या बाळाच्या पालकाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती व एवढे पैसे आणावे कुठून हा एक गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. हतबल झालेल्या त्या बाळाच्या पालकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी संपर्क साधून मदतीचे आव्हान केले होते आणि त्या आव्हानाला दात्यांनी भरभरून प्रतिसाद देत दोन दिवसातच तब्बल एक लाख आठ हजार रुपये इतकी रक्कम दात्यांनी त्यांच्या खात्यामध्ये जमा केली आणि ती रक्कम त्या बाळाचा प्राण वाचवण्यासाठी बहुमूल्य ठरली.
दात्यांचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी मनःपूर्वक आभार मानले तसेच त्या बाळाचे पालक म्हणाले साक्षात चमत्कार झाला दाते देवाच्या रूपाने माझ्या बाळाच्या पाठीशी उभे राहिले आणि माझ्या मुलाचा जीव त्यांनी वाचवला त्यांचे हे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.