You are currently viewing कामगार विरोधी ४ श्रम संहितांच्या विरोधात आणि कामगारांच्या नोकरीला कायदेशिर सुरक्षा किमान वेतन व सामाजिक सुरक्षा मिळवुन घेण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने पुकारलेल्या लढयात सामील व्हा!

कामगार विरोधी ४ श्रम संहितांच्या विरोधात आणि कामगारांच्या नोकरीला कायदेशिर सुरक्षा किमान वेतन व सामाजिक सुरक्षा मिळवुन घेण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने पुकारलेल्या लढयात सामील व्हा!

कामगार विरोधी ४ श्रम संहितांच्या विरोधात आणि कामगारांच्या नोकरीला कायदेशिर सुरक्षा किमान वेतन व सामाजिक सुरक्षा मिळवुन घेण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने पुकारलेल्या लढयात सामील व्हा!

सिंधुदुर्ग

केंद्रीय कामगार संघटना, अखिल भारतीय फेडरेशन्स आणि स्वतंत्र क्षेत्रीय संघटनांच्या संयुक्त मंचाने चार श्रमसंहितांच्या अंमलबजावणीच्या विरोधात व्यापक मोहीम करण्याचा व या मोहिमेच्या अंतिम टप्प्यात कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर देशव्यापी सार्वत्रिक संपाचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी १८ मार्च रोजी कामगारांचे राष्ट्रीय संमेलन दिल्ली येथे घेण्यात आले. महाराष्ट्र सेल्स अ‍ॅण्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज् असोसिशन (एम.एस.एम.आर.ए.) ही सिटू व फेडरेशन ऑफ मेडिकल अ‍ॅण्ड सेल्स रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशन्स् ला संलग्नीत असुन अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचा सक्रीय घटक आहे.
२० मे २०२५ रोजी होणार्‍या देशव्यापी सार्वत्रिक संपाच्या तयारीच्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी १५ मे २०२५ रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार संघटना आणि स्वतंत्र क्षेत्रीय फेडरेशन/संघटना यांच्या संयुक्त व्यासपीठाची बैठक आयोजित करण्यात आली होती. पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्यानंतर देशातील राजकीय घडामोडी आणि त्यांच्या लढाऊ कारवाईत भारतीय सशस्त्र दलांच्या प्रतिसादाचीही त्यांनी दखल घेतली.
९ मे रोजी संयुक्त व्यासपीठाने आपल्या प्रेस निवेदनात पहलगाम येथे निष्पाप लोकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला व सरकारने त्या विरोधात आयोजलेल्या कारवाईला पूर्ण पाठींबा दिला. अशा कठीण काळात देशात फूट पाडणार्‍या द्वेषपूर्ण मोहिमेचा अवलंब करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आवाहन ही त्यांनी सरकारला केले होते. जम्मू आणि काश्मीरसह देशभरातील कष्टकरी जनतेने दहशतवाद आणि द्वेषपूर्ण मोहिमेचा निषेध करत दहशतवादाच्या विरोधात एकता आणि एकता दर्शवत तात्काळ सामूहिक प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक केले होते.
देशभरातील परिस्थितीचा योग्य विचार केल्यानंतर, देशातील जबाबदार देशभक्त नागरिकांचा अविभाज्य भाग म्हणून संयुक्त व्यासपीठाने कामगार संहितेच्या अंमलबजावणी आणि कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या इतर न्याय्य मागण्यांविरुद्ध २० मे ऐवजी तो संप ९ जुलै २०२५ रोजी देशव्यापी संप करण्याचे पुन्हा निश्चित करण्याचा निर्णय घेतला.
तथापि, सर्वात भयावह म्हणजे, दहशतवादी हत्याकांड आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे देशात निर्माण झालेल्या अशा गंभीर परिस्थितीतही, केंद्रातील आणि अनेक राज्यांमधील सरकारांच्या सक्रिय पाठिंब्याने मालक वर्ग आस्थापनांमधील कामगार आणि कर्मचार्‍यांवर हल्ले करत आहे. कामाचे तास एकतर्फी वाढवले जात आहेत; वैधानिक किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा लाभांचे उल्लंघन केले जात आहे. कामगारांना कामावरून काढून टाकले जात आहे. हे कुप्रसिद्ध कामगार संहिता मागच्या दाराने लागू करण्याचे घृणास्पद प्रयत्न आहेत. त्याच वेळी, कामगार संघटनांनी वारंवार मन वळवूनही, सरकारने केंद्रीय कामगार संघटनांना भेटण्याची आणि सल्लामसलत करण्याची किंवा भारतीय कामगार परिषद आयोजित करण्याची तसदी घेतली नाही, जरी देशाच्या कानाकोपर्‍यातून सर्व क्षेत्रांमधून संपाच्या सूचना मिळाल्या तरीही.
केंद्र सरकार एप्रिल २०२५ पासून श्रमसंहितांची अंमलबजावणी करणार असल्याचे वारंवार जाहीर करत आहे. श्रम मंत्र्यांनी राज्यांच्या श्रमखात्याचे सचिव व अन्य अधिकारांसोबत बैठक घेऊन त्यांचा कामगार विरोधी, कॉर्पोरेट धार्जिण्या श्रमसंहिता राबवण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. कामगारांचे नोकरीची कायदेशीर सुरक्षा, कामाचे तास, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा इत्यादींबाबतचे अधिकार नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर संघटित होण्याच्या, आपल्या युनियनला मान्यता मिळवून घेण्याच्या, सामूहिक वाटाघाटींच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करवून घेण्याच्या व संप, लढे करण्याच्या कामगारांच्या मूलभूत अधिकारावर देखील गदा येणार आहे. श्रमसंहिता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कॉर्पोरेट मालकांचे भले करण्यासाठी कामगारांवर लादण्यात येणारी गुलामी आहे.
श्रमसंहिता अंमलात आणण्यामागची सरकारची भूमिका स्पष्ट आहे. एकदा का कामगार वर्गाची गळचेपी केली की जनतेच्या लोकशाही अधिकारांवर, सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याच्या अधिकारावर, सरकारच्या जनविरोधी पावलांवर टीका करण्याच्या अधिकारावर आणि एकूणच मूलभूत मानवी अधिकारांवर गदा आणणे सहज शक्य होईल. महाराष्ट्रात फडणवीस सरकारने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक पारित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. कामगार, कष्टकर्‍यांचे त्यांच्या रोजी, रोटीच्या प्रश्नांवरील लढे दडपण्याचेच हे कारस्थान आहे. म्हणूनच आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठीचा लढा एका नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी समस्त कामगार, कष्टकर्‍यांनी खालील मागण्यांसाठी ९ जूलै रोजी होणारा संप यशस्वी करावा असे आवाहन एम.एस.एम.आर.ए. करत आहे.
केंद्र सरकारकडील मागण्या
१. १०० वर्षांच्या लढ्यांमधून मोठ्या कष्टाने मिळवून घेतलेले कामगार कायदे रद्द करून तयार केलेल्या कॉर्पोरेट धार्जिण्या, कामगारविरोधी चार श्रमसंहिता मागे घेऊन कामगारांच्या बाजूचे कायदे करा व त्यांची कडक अंमलबजावणी करा. कामाच्या तासात वाढ करू नका. कोणत्याही क्षेत्रात निश्चितकालीन रोजगाराला मान्यता देऊ नका. कामगार कायद्यांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक शिक्षेची कारवाई करा.
२. सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज अ‍ॅक्ट १९७६ (सेवा शर्ती) चे पुर्नजिवित करा. व वैद्यकीय प्रतिनिधींच्या सर्वसामान्य कामकाजाचे वैधानिक नियम तयार करा.
३. ८ तासाचे कामासाठी ३०,००० रुपये किमान मासिक वेतन व १०००० रुपये मासिक पेन्शन लागू करा. ईएसआय, पीएफ लागू, ग्रॅज्युईटी, बोनस, वर्कमन कम्पेनशेषन अ‍ॅक्ट मधील वेतन मर्यादा: यावरील सिलींग रद्द करा .
४. सरकारी इस्पीतळ व आरोग्य व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना प्रमोशन साठी बंदी करणारा केंद्रीय सार्वजनिक आरोग्य खात्याचा जि.आर. रद्द करा. व वैद्यकीय प्रतिनिधींच्या घटनाद्त्त रोजगार अधिकाराचे संरक्षण करा.
५. औषधासहीत सर्व जिवनावश्यक कमोडीटीज् च्या किंमतींचे नियमन करा व त्यावरील जि.एस.टी.रद्द करा.
६. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा व त्यांचे पुर्नजिवन करा.
७. नकली औषध उत्पादकांवर कडक कायदेशीर कारवाई करुन त्यांना तुरुंगवासाची शिक्षा करा.
८. संघटना बांधणी, सामूहिक वाटाघाटी व संप, लढे करण्याच्या लोकशाही अधिकारांवर गदा आणू नका. अर्ज केल्याच्या ४५ दिवसांच्या आत कामगार संघटनांची नोंदणी अनिवार्य करा.
९. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा सेवांचे खाजगीकरण थांबवा. रेल्वे, विमा व संरक्षण क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक व खाजगीकरण बंद करा.
राज्य सरकार कडील मागण्या
१. वैद्यकीय प्रतिनिधी म्हणजेच विक्री संवर्धन कर्मचार्‍यांना किमान वेतन ३००००/- घोषीत करा.
२. ८ तासाच्या कामाच्या जि.आर.ची अंमलबजावणी करा.
३. लोकशाही व स्वातंत्र्यावर हल्ला करणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या.
४. संघटना बांधणी, सामूहिक वाटाघाटी व संप, लढे करण्याच्या लोकशाही अधिकारांवर गदा आणू नका. अर्ज केल्याच्या ४५ दिवसांच्या आत कामगार संघटनांची नोंदणी अनिवार्य करा.
५. सर्व कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षेची हमी, स्थानिक पातळीवर लैंगिक छळ विरोधी तक्रार निवारण समित्यांचे गठन करा.व एकाच प्रकारचे काम करणार्‍या महिलांचे व पुरुषांचे वेतन समान ठेवा.
औषधी व्यवस्थापनाकडील मागण्या
१. औषध विक्री उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय प्रतिनिधींचा मानसिक छळ करणे व त्यासाठी नोकरीतून बडतर्फ करणे / बदली करणे बंद करा.
२. इलेक्ट्रॉनिक गॅझेट द्वारा ट्रॅकिंग व सर्व्हीलन्स करुन वैयक्तिक गोपनियता व खाजगीपणावर अतिक्रमण बंद करा.

युनिट सेक्रेटरीचे नाव – काॅ. जयेश कदम
युनिटचे नाव- MSMRA SINDHUDURG UNIT
मोबाईल नंबर 9422435932

______________________________
*संवाद मीडिया*

👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓

*प्रवेश सुरू!! प्रवेश स्वरू!!!प्रवेश सुरू!!!*

*💊💊B.PHARMACY व D.PHARMACY 💊💊🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓*

*फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा! B.Pharmacy आणि D.Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा. फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा!*

डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फार्मसी, दापोली.*
*तालुका- दापोली, जिल्हा- रत्नागिरी*
(सलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे आणि PCI-Delhi,DTE,MSBTE व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त )
*DTE CODE-03712*

*👉अभ्यासक्रम :*
*🔸️फार्मसी पदविका (D.Pharmacy)*
*Choice Code-0371282311)*
प्रवेश क्षमता- ६०
*पत्रता*-बारावी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अनिवार्य विषयामध्ये उत्तीर्ण आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एका विषयासह उत्तीर्ण.

*🔸️फार्मसी पदवी (B.Pharmacy)*
*Choice Code-0371282310)*
प्रवेश क्षमता- ६०
*पात्रता*- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित मध्ये ४०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, सामान्य श्रेणीसाठी वर्गी / श्रेणी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिकशास्त्, रसायनशास्त्र, जीवशास्त्र मध्ये ४५ गुण. MH-CET अनिवार्य आहे

*👉प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्य मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एकवेळ महाविद्यालयास अवश्य भेट द्या.🙏*

*संपर्क-*
*9420156771, 9145623747, 7887561247*

*पत्ता*- प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी

(कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.)

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/176501/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा