You are currently viewing हळदीने माखा मला…
Oplus_16908288

हळदीने माखा मला…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हळदीने माखा मला….*

 

हळदीने माखा मला करा करा पिवळी

वाटते का राया सांगा, तुम्हा सावळी..

वाटते का राया सांगा तुम्हा सावळी….

 

जीव टाकते तुमच्यावरती मर्दानी हो तुम्ही

जरी सावळी भासे तुम्हाला आहे मी फारच गुणी

सोभंल राणी तुमची सांगते आहे मी कवळी कळी..

वाटते का राया सांगा …

 

चाफेकळी मी चाल चालते दिसते हो सुंदर

आपण दोघे मिळून बांधू प्रेमाचे मंदिर

पैंजण माझे छुम्मक छुम्मक बांधा डोरलं गळी…

वाटते का राया सांगा…

 

श्यामल सुंदर रंग हो माझा राधा मी बावरी

गाठ बांधूनी शालूला मी चढंल तुमची पायरी

किती मी साजरी दिसते पहा ना दर्वळते कर्दळी

वाटते का राया सांगा…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा