You are currently viewing बघ होऊन प्रवाही

बघ होऊन प्रवाही

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बघ होऊन प्रवाही*

 

आभाळातील काळे ढग
सहज बरसून जातात
धारेच्या रूपात भुईवर
प्रवाही होत वाहतात….

मोकळे होतात सूर्यकिरण
येती भूवर सावकाश
बंधन नसता विखुरतो
लख्ख तेजांकीत प्रकाश…

विचारांच्या साठवणीला
करावे त्वरित मुक्त
एकमेकांच्या जवळ
भावना कराव्यात व्यक्त….

झटकून काजळी मनाची
चेतवून पहा ह्रदयदीप
काळोखात चाचपडणे नको
जावे उजेडाच्या समीप…..

साचलेल्या विचारांनी
कुंठीत होते मती
काहूर उठतं जीवनात
थांबते आयुष्याची प्रगती…

जुनी सोडा विचारधारा
नव्याचे करा आचरण
नवदिशा नवे वारे
सूत्र धरावे मनोमन….

साचलेले डबके सोडा
कोसळा होऊन प्रपात
सरितेसारखं झुळझुळत
सामावून जा सागरात….

थांबलेला झोका कधी
उंच नाही जाणार
आकाशाला भिडण्यासाठी
जिद्द नाही ना येणार…

थांबला तो संपतो
चालत राहा प्रगतीची वाट
संकटे येवोत कितीही
चढत रहा यशाचा घाट…

मती ज्ञान बुध्दी प्रज्ञा
सदैव असावी प्रवाही
स्वतःजवळील इतरांना द्या
यशस्वी जीवनाची ग्वाही…।।

००००००🍃🌺🍃००००००
*अरुणा दुद्दलवार@✍️*

 

————————————————-

*संवाद मिडिया*

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

*Advt Link👇*

————————————————–
📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

📱 *संपर्क:*
सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132
सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा