You are currently viewing गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कोविड योध्यांचा गौरव

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कोविड योध्यांचा गौरव

कणकवली रोटरी क्लब चा उपक्रम

कणकवली :

रोटरी क्लब कणकवलीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कोविड योद्ध्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा समारंभपूर्वक यथोचित गौरव केला. विशेषतः हा कार्यक्रम शासकीय यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस, सामान्य कर्मचारी वर्ग कोवीड संदर्भात करत असलेल्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केला होता. रोटरी क्लबचे प्रेसिडेंट.रो.डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या अध्यक्षखाली व डॉ. बाळकृष्ण महाडेश्वर वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी.एम. शिकलगार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. स्व. डॉक्टर दिवाकर मराठे. चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाबाबत रोटरी क्लब ची भूमिका स्पष्ट करताना प्रेसिडेंट.रो.डॉ. विद्याधर तायशेटे म्हणाले की, रोटरी नेहमीच अशा व्यक्तींच्या पाठीशी आहे जे लोक अशा संकटकालीन काळात आपला जीव धोक्यात घालून काम करतात त्यांच्या कार्याची नोंद समाजाने घेतलीच पाहिजे तरच त्यांना पुढे काम करण्यास अधिक बळ मिळेल केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाचे श्रेय त्यांना मिळून पाठीवर शाबासकीची थाप मिळेल, त्यातून पेरणा मिळत असते. समाजाने आपल्या कामाची नोंद घेतली याची त्यांना जाणीव व्हावी म्हणून अशा समारंभाचे महत्व असते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रेझर रो. रवींद्र मुसळे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी रोटरीने या जिल्ह्यातील आणि कणकवली तालुक्यातील जवळपास सर्व कोविड योध्या व्यक्तींची नोंद घेतलेली असून ह्यासाठी झटत असलेल्या डॉक्टर नर्सेस अन्य सेवक ॲम्बुलन्स चालक समशान भूमीत काम करणाऱ्या व्यक्ती या सर्वांच्या सेवेचे कौतुक रोटरी क्लब करत आलेला आहे.आजही हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमासाठी रो.डॉ.अमेय मराठे यांनी सहकार्य केल्याचेही नमूद केले.प्रमुख अतिथी डॉ.म्हाडेश्वर यांनी स्व.डॉ.दिवाकर यांच्या स्मृति जागवताना काही आठवणी सांगितल्या. स्व.डॉ.दिवाकर मराठे यांच्या सारखे आज सेवाभावी तज्ञ डॉक्टर यांची गरज समाजास असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.आज आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे कोविड साठी काम करणारे सर्व डॉक्टर्स व 14 परिचारिका सह अन्य कर्मचारी वर्गाचा प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.


उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथील कोवीड कक्षाचे गरज विचारात घेऊन रोटरी क्लबच्या माध्यमातून रोटरी प्रेसिडेंट रो.डॉ. विद्याधर तायशेटे यांनी हॉट अँड कॉल्ड वॉटर डीसेपेनसर विथ फ्रिज मशीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिकलगार यांच्याकडे सुपूर्द केला.रोटरी क्लबच्या या देणगी बद्दल डॉक्टर विद्याधर तायशेटे आणि रोटरी क्लब चे सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रमात रोटरी क्लब चे दीपक बेलवलकर, सेक्रेटरी एडवोकेट राजेंद्र रावराणे, दादा कुडतरकर, रमेश मालवीय सौ.सुंदर मालवीय, दीपक अंधारी, नितीन बांदेकर, संतोष कांबळे, डॉक्टर दिवाकर मराठे, ट्रस्टचे अध्यक्ष रो डॉक्टर अमेय मराठे, भेराराम राठोड,आधी मेम्वर्स उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रो दीपक अंधारी यांनी नियोजन केले सर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचलन रो दादा कुडतरकर यांनी केले.

या कार्यक्रमात अड. राजेंद्र रावराणे यांच्या परिवारातील सदस्य रो. राजेश्री रावराणे.रो. दिशा अंधारी रो. सौ. सुंदर मालवीय रो.सुप्रिया नलावडे रो भेराराम राठोड रो.निखिल बांदेकर.रो राजेश कदम. रो. वीरेंद्र नाचणे ,रो. दीपक अंधारी, अन्य रोटरी मेम्वर्स व काही निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − seven =