पवारांनी केलेले कौतुक कायम प्रेरणा देईल – सतीश सावंत

पवारांनी केलेले कौतुक कायम प्रेरणा देईल – सतीश सावंत

जिल्हा बँकेच्या वतीने वाढदिवस साजरा…

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे केलेले कौतुक कायम प्रेरणा देईल. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला साजेसे काम करून सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल, असे अभिवचन जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी आज येथे केले. श्री.सावंत यांचा आज जिल्हा बँकेच्यावतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक प्रकाश गवस, व्हिक्टर डॉन्टस, निता राणे, दिगंबर पाटील, विद्याप्रसाद बांदेकर, प्रमोद गावडे, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, नागेंद्र परब आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्याची व गोरगरिबांची बँक आहे. त्यामुळे बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यशस्वी करून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल? रोजगार कसा मिळेल?  या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. श्री पवार यांनी केलेले कौतुक आमच्या कार्याला आणखीन प्रेरणा देईल, असा विश्वास सतीश सावंत यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा