You are currently viewing मासेमारी व्यवसायावर जेलिफिशचे संकट..

मासेमारी व्यवसायावर जेलिफिशचे संकट..

मासेमारी व्यवसायावर जेलिफिशचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या महिन्याभरात मासे कमी आणि जेलिफिश जास्त अशी परिस्थिती आहे. यामुळे रापणकर मच्छीमार सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या महिन्याभरात जेलिफिश ने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेले आहे मच्छीमारांच्या जाळ्यात मासांपेक्षा जास्त जेलिफिश सापडत आहेत.

वाऱ्याचा जोर किनाऱ्याच्या दिशेने असल्याने सध्या जेलिफिश किनार्‍यालगत मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. त्यामुळे रापण करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात जास्त करून जेलीफिश आढळून येतात. यात आज दांडी एका रापण संघाच्या जाळ्यात बंपर जेलिफिश सापडल्या. त्या भेटलेल्या जेलीफिश बाजूला करण्यातच सर्व मच्छीमारांचे अक्षरशा कंबरडे मोडले.

मोठ्या प्रमाणातील जेलीफिष मध्ये दबले गेलेले मासे वेगळे करताना मच्छीमारांची पुरती दमछाक झाली तरीदेखील मच्छीमारांनी जेलीफिश किनाऱ्यावर न टाकता त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावत समुद्रकिनारा स्वच्छ केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 3 =