You are currently viewing रविवार दि.२२ जानेवारी २०२३ ला ठाणे, मुंबई येथे साकव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन

रविवार दि.२२ जानेवारी २०२३ ला ठाणे, मुंबई येथे साकव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन

मुंबई :

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या विश्व साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर साकव्य समूहाच्या सदस्यांचा स्नेहमेळावा उद्या दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी माझिवडे, ठाणे मुंबई येथे ज्येष्ठ लेखिका कवयित्री, गायिका श्रीमती अरुणाताई मुल्हेरकर यांच्या निवासस्थानी पार पडत आहे. दुपारी ठीक ४.०० वाजता स्नेहमेळाव्याला सुरुवात होणार असून प्रथम उपस्थितांचे यथोचित स्वागत आणि ओळख परेड होईल.

स्वागत समारंभानंतर प्रास्ताविक साकव्य समूहाचे अध्यक्ष मा.श्री.पांडुरंग कुलकर्णी सर यांच्या हस्ते होईल. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित साकव्य सदस्य साहित्यिक, कवी कवयित्रींच्या काव्य वाचनाचा बहारदार कार्यक्रम पार पडणार आहे.

स्नेहमेळाव्याचे खास आकर्षण म्हणजे श्री.विलास जी कुलकर्णी साकव्य जनसंपर्क अधिकारी यांचे आरोग्य व निसर्गोपचार मार्गदर्शन, आणि श्रीम.अरुणाताई मुल्हेरकर यांची आवाजाची कार्यशाळा व संगीताचे प्राथमिक ज्ञान. रंगतदार होणाऱ्या कार्यक्रमास साकाव्य सदस्यांनी जरूर उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष श्री.पांडुरंग कुलकर्णी व श्रीम. अरुणाताई मुल्हेरकर यांनी केलं आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व सदस्यांना प्रेमाची भेट म्हणून लावणी पुस्तक भेट दिले जाईल.

कार्यक्रम स्थळ:

*अरूणा मुल्हेरकर*

*रुस्तमजी अरबानिया*

*ॲक्यूरा~C 302*

*माझीवडे, ठाणे,400601*

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 8 =