You are currently viewing शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

१६ ते ३० मे पर्यंत प्रक्रिया पार पडणार

 

सिंधुदुर्ग :

 

जिल्हांतर्गत बदली झालेल्या ११५० शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे व दुसऱ्या शाळेत हजर होण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिले आहेत. त्यामुळे १६ मे ते ३० मे या कालावधीत संबंधित शिक्षकांना ही प्रक्रिया पार पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोना कालावधीमुळे लांबलेल्या जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया यावर्षी शासनाने ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केली आहे. या ऑनलाईन बदली प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील ११५४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. या शिक्षकांना मे महिन्याच्या १६ ते ३० तारीखपर्यंतच्या कालावधीत संबंधित शाळेवर हजर होण्याबाबतचे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. त्यामुळे ‍ बदली झालेले शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यमुक्तीबाबतच्या प्रशासकीय आदेशाच्या प्रतीक्षेत होते. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी याबाबतचे आदेश पारीत केले आहेत.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत करण्यात आलेल्या बदल्या या विनंती बदल्या आहेत. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना सध्याच्या कार्यरत शाळेतून कार्यमुक्त झाल्यानंतर लगतच्या दुसऱ्या दिवशी बदली शाळेवर हजर होणे बंधनकारक आहे. त्यामुळे १६ ते ३० मे या कालावधीत कार्यमुक्त होणे व हजर होणे ही प्रक्रिया पार पाडता येणार आहे. दरम्यान मयत, सेवानिवृत्त व स्वेच्छा निवृत्ती यामध्ये चार शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे ११५० शिक्षकांच्याच बदल्या होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 2 =