अनधिकृत होणारी सिलेंडर विक्री थांबवा – हुसेन लांजेकर.

अनधिकृत होणारी सिलेंडर विक्री थांबवा – हुसेन लांजेकर.

त्या एजंटावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

वैभववाडी
गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री करणाऱ्या एजंटावर कारवाई करा. अशी मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. सिलेंडरची बेकायदेशीर विक्री करणार्‍यावर कारवाई न झाल्यास युवा मोर्चा मार्फत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पोलीस व तहसील प्रशासनाला निवेदनातून देण्यात आला आहे.
वैभववाडीत अधिकृत गॅस एजन्सी व्हावी. अशी मागणी जनतेतून अनेक वर्ष होत होती. या पार्श्वभूमीवर कित्येक वर्षांनी जयेंद्र इंण्डेन इंडियन ऑइल ही अधिकृत एजन्सी तालुक्याला मिळाली आहे. तालुक्यात हक्काची अधिकृत एजन्सी असताना जिल्ह्यातील व तालुक्यातील एजंट इतर एजन्सीच्या नावाखाली जादा पैसे घेऊन सिलेंडर विकत आहेत. काही एजंटांनी घरे भाड्याने घेऊन गोडाऊने तयार केली आहेत. तालुक्‍यातील जनतेची होणारी लूट आम्ही कदापिही खपवून घेणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. ग्राहकांनी आपले गॅस कनेक्शने सरकारमान्य एजन्सीकडे ट्रांस्फर करावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन हुसेन लांजेकर, किशोर दळवी, नवलराज काळे, अतिश माईणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा