गोगटे – वाळके महाविद्यालय, बांदा येथे राष्ट्रीय छात्रसेना शिबिराचे उद्घाटन

गोगटे – वाळके महाविद्यालय, बांदा येथे राष्ट्रीय छात्रसेना शिबिराचे उद्घाटन

बांदा

देशातील तरुणांमध्ये देशाभिमान जागृत करणे व सैन्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना झाली असून विद्यार्थ्यांनी या छात्रसेनेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन देशसेवेत सहभागी व्हावे असे प्रतिपादन ५८ महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्गचे ज्युनिअर कमिशनर ऑफिसर मा. सत्यनाम सिंग यांनी बांदा येथील गोगटे – वाळके महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेच्या ‘ ब ’ प्रमाणपत्र शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
१५ जानेवारी या भारतीय सैन्य दिवसाचे औचित्य साधून येथील गोगटे – वाळके महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये छात्र सैनिकांना सैन्य दलाशी संबंधीत विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. डी.बी.वारंग होते या जवानांचे आणि किसानांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे असे प्रतिपादन या प्रसंगी मा. वारंग यांनी केले. त्याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री.एस.आर. सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सह सचिव मा.श्री डी.एस.पणशीकर उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.गोविंद काजरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय छात्रसेना विभाग प्रमुख डॉ.पुष्पराज सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.शरद शिरोडकर तर सूत्रसंचालन प्रा.रमाकांत गावडे यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा