You are currently viewing रंगपंचमी

रंगपंचमी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ स्मिता श्रीकांत रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”रंगपंचमी”*

रंग पंचमी साजरी
सृष्टी वसंतात दंग
फूले पळस गोजिरी
उधळीत सप्तरंग ||१||

रंग प्रेमाचा सुगंध
नाते रेशमी विणले
कृष्ण गोपिका बेधुंद
चिंब रंगात रगंले ||2||

धुळवड पचंमीची
भूमी समृध्द सणानी
स्नेहबंध जिव्हाळ्याची
दृढ करुया प्रेमानी ||३||

राधा कृष्ण रास वनी
आनंदाची उधळण
रज उडे वृदांवनी
दंग झाली गवळण ||४||

अंहकार द्वेष जाळी
होळी पेटवी समिधा
दावू या पुरणपोळी
करु संकल्प विविधा ||५||

प्रीती गोफ कान्हामय
भुले सख्या मुरलीला
रंग खेळे स्नेहमय
भक्ती रंग पंचमीला ||६||

सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.

प्रतिक्रिया व्यक्त करा